फिनलंड ट्रीप 29 Nov
गाडी पुढे धावत होती पण माझं विचारांचं चक्र माग धावत होतं. ते जाऊन पोहोचलं ते जानेवारी चौदा जेव्हा माझ्या बॉस नि सांगितलं कि या वर्षी चान्स आहे तुला प्रवासाचा , तयारी आहे ना जायची. अर्थात मी पटकन हो म्हटलं , तयारी कसली होती खरं, माझा पासपोर्टपण नव्हता . मग तो म्हणाला गडबड नाहीये तू नॉर्मल प्रोसेस मध्ये पासपोर्ट काढलास तरी हरकत नाही . इतके दिवस पुढे ढकललेलं काम आता करायला लागणार होतं , कार णं खुप होती , अर्थात जॉन डियर ला लागल्यापासून माहित होतं कि कधी न कधी जायचं तर आहेच , पण तरी तो तयार नव्हता यात काही टक्के माझा आळशीपणा होताच पण त्याहीपेक्षा बऱ्याच गोष्टी होत्या , आधी प्रणवला विचारलं जाऊ का ? तो हो म्हणाला , पण त्याच्या बोलण्यातून काहीच धीर नव्हता आला , लक्षात आलं ही माझ्या मनाची लढाई आहे , वाटल नकोच काढायला पासपोर्ट म्हणजे ते कारण पुढे करता येईल न जाण्याचं . एक महिनाभर आर्या, ...