फिनलंड ट्रीप 29 Nov

गाडी पुढे धावत होती पण माझं विचारांचं चक्र माग धावत होतं. ते जाऊन पोहोचलं ते जानेवारी चौदा जेव्हा माझ्या बॉस नि सांगितलं कि या वर्षी चान्स आहे तुला प्रवासाचा, तयारी आहे ना जायची. अर्थात मी पटकन हो म्हटलं, तयारी कसली होती खरं, माझा पासपोर्टपण नव्हता

मग तो म्हणाला गडबड नाहीये तू नॉर्मल प्रोसेस मध्ये पासपोर्ट काढलास तरी हरकत नाही. इतके दिवस पुढे ढकललेलं काम आता करायला लागणार होतं, कारणं खुप होती, अर्थात जॉन डियरला लागल्यापासून माहित होतं कि कधी कधी जायचं तर आहेच, पण तरी तो तयार नव्हता यात काही टक्के माझा आळशीपणा होताच पण त्याहीपेक्षा बऱ्याच गोष्टी होत्या, आधी प्रणवला विचारलं जाऊ का? तो हो म्हणाला, पण त्याच्या बोलण्यातून काहीच धीर नव्हता आला, लक्षात आलं ही माझ्या मनाची लढाई आहे, वाटल नकोच काढायला पासपोर्ट म्हणजे ते कारण पुढे करता येईल जाण्याचं. एक महिनाभर आर्या, प्रणव, घर, माझं गावं, माझी माणसं सोडून कसं काय राहायचं, आणि आर्याचं काय ती कशी राहिलं माझ्याशिवाय, विचारपण करवत नव्हता, मन तयारच होत नव्हत, मग शेवटी सासुसासार्यांशी म्हणजे आईबाबांशी बोलले, आणि माझ्यात खूपच उत्साह संचारला, दोघांनी हेच सांगितलं आम्ही आहोत आर्याला सांभाळायला, तू संधी सोडू नकोसं. 

मग मी पासपोर्ट मोहीम हाती घेतली, एकंदरीत कागदपत्र गोळा कारण कर्मकठीण होतं, माझ्या जन्म दाखल्यावर नाव स्पृहा गाडगीळ, शाळेच्या दाखल्यावर आणि बाकी ठिकाणी सुजाता गाडगीळ आणि आता पूर्वा गबाळे, त्याहीपेक्षा भयानक कथा पत्त्याची ड्रायविंग लायसन्सवर कोल्हापुरातला माहेरचा पत्ता, फोर व्हिलरच्या लायसन्सवर खराडीचा पत्ता, बँक चिंचवडचा पत्ता, नवीन जागी नुकतंच शिफ्ट झालेलो त्यामुळे तिथला तर काहीच पुरावा नाही. बाप रे कसा बनणार माझा पासपोर्ट. पण मग जर जुगाड करून लग्न झाल्यावर शाहूपुरी कोल्हापूर वरून जरग नगर कोल्हापुरात, घरीच राहतीय नोकरी पुणे काही संबंध नाही, असं करून एकदा अर्ज भरला.  महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळाली, दोन कागदपत्र अमान्य, परत पाठवलं, मग त्याच्यासाठी दर आठवड्यात कोल्हापूर फेऱ्या, पोलीस वेरिफिकेशन, पाच तास खाऊन सांगितलं रेशन कार्ड हवंय, त्यावर मुंढव्याचा पत्ता, मग मनाला पटणारी पण इलाज नसलेली गोष्ट, पैसे, एवढं करून पंधरा दिवस झाले तरी फाईल पुण्यात येईना मग माझ्या बाबांना सांगितलं बघून या, तर माझं डिग्री सर्टिफिकेटसाठी गाडं अडलेलं, मग एकदाची इकडून पुण्यात गेली फाईल, पंधरा पंधरा दिवस असेच जात होते, स्टेटसमध्ये काही फरक नाही, मग मी माझं ऑफिस सोडून सेनापती बापट रोड पासपोर्ट ऑफिसवर, तर ती लोकं अतीशहाणी, म्हणे तुम्ही सांगताय कि कोल्हापुरातून इकडे आलीय फाईल ती कशावरून, ते आलेला पोस्टाचा गठ्ठा बघायला नाही तयार, गरज आपली म्हणून शांत पणे सहन केलं, ई-मेल केला पावती नंबर, या गोंधळात ऑगस्ट मधली ट्रीप पुढे ढकलायला लागली, मग पुढे अजून एक महिना गेला, कारण त्यांच्याकडचा प्रिंटर पेपर संपला, एवढ्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नऊ महिन्यांनी पासपोर्ट हातात पडला. आर्यानीपण साडेआठ महिनेच वाट पाहायला लावली होती. पासपोर्ट हातात आल्यावार नवीन तारखा ठरवण्यात आल्या, मग व्हिसा प्रोसेस सुरु झाली, तिकीट बुक करताना लक्षात आलं कार्पोरेट क्रेडिट कार्ड डिक्लाईन होतंय, एवढ्यावर सुखासुखी काही होणं माझ्या प्रवासात नव्हतचं, मग कळलं कार्ड ऍक्टिवच केलं नव्हतं, कारण तीन वर्षात गरजचं नव्हती पडली. इतके वर्ष वापर्ल्यमूळे बँकेनी ब्लॉक केलं होतं, मग परत नवीन कार्डसाठी  रिक्वेस्ट, परत ठरलेल्या तारखा उलटून जायला लागल्या, म्हणजे ऑफिसमध्ये पोहोचलं कि रोज एक नवीन प्रश्न  वासलेला, मग कोणीच करत नाही असं, पर्सनल क्रेडिट कार्ड वापरायची परवानगी,  व्हिसा अपॉइंटमेंटसाठी दिल्ली, आयुष्यात पहिलाच प्रवास एकटीचा, दिल्लीत एकट राहायचं या विचारांनी दोन तीन रात्री झोपंच लागेना. आता व्हिसा a सरळ मिळेल हि आशाच सोडली होती त्याप्रमाणे एक खोट निघालीच, कोणालाच मागितलेला सविस्तर अजेन्डा मला मागितला, पण माझ्या भारतातल्या आणि फिनलंडच्या सहकाऱ्यांच्या सहचार्यामुळे सगळ व्यवस्थित पार पडलं, पुण्यात गेल्यावर कुरिअरवाल्यांच्या थोड्याफार घोळानंतर थोडं उशीराच कार्पोरेट क्रेडिट कार्ड हातात आलं, लगेच ऍक्टिव्ह करून घेतलं, वापरून पाहिलं तर परत डिक्लाईन. माझ्या मागचं शुक्लकाष्ट संपायलाच तयार नव्हतं, बँकवाले म्हणायचे तुम्ही व्हॅलिड डेट चुकीची टाकताय, प्रॉब्लेम कळतच नव्हता मग डायरेक्ट बँक मॅनेजरशी बोलले तर त्याला सापडलं कि त्याच्या रेकॉर्डमधली आणि माझ्या कार्डवरची तारीख मॅच नाही होत. म्हणतोय माझ्या पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये असा पहिल्यांदाच प्रॉब्लेम बघतोय, परत नवीन कार्ड, इकडे येण्याच्या आदल्या दिवशी कार्ड हातात आलं, बर या सगळ्यामध्ये अशी गोष्ट घडली कि सगळे कलीग माझ्या आधीच जाऊन आले आणि सगळा प्रवास एकटीलाच करावा लागणार होता, सगळा धीर एकवटून महाराजांना सोबत यायला सांगून घराबाहेर पडले, माझ्या सगळ्या जवळच्या माणसांमुळे मूळे इथपर्यंत चा प्रवास शक्य झाला. माझ्या लेकीने तर खूपच छान एक्सेप्ट केलं आणि चेंज बत अड्जस्ट झाली, आर्याचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आला आणि एकदम सगळ सोप्प वाटलं, गाडी कंपनीच्या पार्किंग मध्ये पार्क झाली तशी भूतकाळातून वर्तमानात आले आणि सगळ समान घेऊन ऑफिस मध्ये गेले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४