पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घर सोडताना

इमेज
इथे सहकारनगरला आलो त्याला जवळपास पाच वर्ष झाली. दिवस वाऱ्यासारखे भुर्र उडून गेले. अनय वर्षाचा होता जेमतेम आणि आर्या तिसरीत.  नवी शाळा, नवी जागा, नव्या मैत्रिणी, कसं जुळवून घेईल ती अशी काळजी वाटत होती. पण तिच सगळ्यात लवकर रुळलेली. शाळा आवडली, छान मैत्रिणी मिळाल्या जिवाभावाच्या. मी पुणेकर असा अभिमान तर काहीच्या काही वाढला. अनय तर इथलाच, त्याला लहानपण म्हटलं की या घराच्या आठवणी येतील आयुष्यभर. बाळ होता तेव्हा खिडकीत उभा राहून पोपट बघायचा.  लग्नापूर्वी आम्ही काही निमित्तानी सहकारनगरात यायचो, इथली झाडं, रस्ते, घर यांच्या प्रेमात पडलो. मला तर आमच्या प्रेमाचा साक्षात्कारच तळजाईला येऊन झाला. त्यामुळे सुप्त मनात सहकारनगर विषयी ओढ होती, आणि दहा वर्ष खराडी, मुंढवा, हडपसर सारख्या रुक्ष भागात राहिल्यावर ऑफीस लांब असूनही पाच वर्षांपूर्वी सहकार नगरात आलो.  हे राहातं घर भाड्याचं आहे, पण इतके वर्ष इथे राहिल्यावर घराला जीव लावला नाही तरच नवल. त्यात जेव्हा घर बघितलं तेव्हाच प्रेम जडलं घरावर. दारात स्वामींचा फोटो, मोठाच्या मोठा हॉल आणि सगळ्यात आकर्षण म्हणजे हि मोठी गच्ची, गच्चीत झुला, आणि झु...

फिनलंड ट्रीप डायरी १३ नोव्हेंबर २०१४

इमेज
रात्रीचे आठ वाजलेत आणि बाहेर तापमान फक्त उणे तीन डिग्री सेल्सिअस आहे. नखशिकांत  उबदार कपडे  चढवून लिहायला बसले आहे. बाहेर पडलं कि नाक, गाल आणि हातापायाची बोटं बधिर होतात.  योएनसू, जिथे मी काल संध्याकाळी पोहोचले ते शहर, शहर कसलं  एक टुमदार गावं. मी राहतेय त्या भागाचं नावं आहे हॉलिडे लिंनून लहती कॅम्प, लहती म्हणजे किनारा, नदी किनाऱ्यावरचा कॅम्प, त्यांची बरीच मोठी जागा आहे आणि त्यात वीस पंचवीस अपार्टमेंट्स आहेत, अपार्टमेंट्स म्हणजे एक छोटी माडी असलेली दोन जोडलेली बैठी  घरं.   दारातुन आत आल्यावर डावीकडे एक कोनाडा आहे, त्यात हँगर लावलेत, बाहेरून आलं कि ओव्हरकोट, जर्किन तिथे काढून ठेवायचं,आपल्यासारखे चप्पल बुट काढून मगच घरात प्रवेश करायचा.  त्या शेजारी प्रशस्त बाथरूम, त्यात आत लपलेली आणि एक खोली, तोच फिनिश लोकांचा सुप्रसिद्ध सौना. खोलीत  एक लाकडी बेंच असतो आणि तिथे बसून स्टीम बाथ घ्यायचा. फिन्निश लोकांच्या घराघरात ही सोय असते म्हणे, मायनस पाचच्या खाली टेम्परेचर गेलं कि सौना घेणं आवश्यक असतं, मला पहिल्यांदा हा शौक आहे अस वाटलेलं. उजवीकडे ए...

फिनलंड ट्रीप डायरी १२ नोव्हेंबर २०१४

इमेज
आज ताम्पेरेतला शेवटचा दिवस होता,  पेरत्तू  काहीतरी भेट द्यायची होती, मॉल मध्ये थँक यु ग्रीटिंग्ज बघितले, पण खूपच महाग वाटले, मग काळ संध्याकाळी घरी आल्यवर एक ग्रीटिंग तयार केलं, उडणाऱ्या फॉर्वर्डरचं किंवा ओंडके पकडलेल्या हेलिकॉप्टरचं स्केच बघितलं होतं ऑफिसमध्ये तसंच स्केच काढलं कागदावर, ऑफिसमधून निघतानाचं पेन्सील, रबर आणि कागद घेऊन ठेवला होता. स्केच काढून त्याला गिफ्ट केलं, इतका खुश झाला, त्याच्या क्युबिकलमध्ये लावलं ते ग्रीटिंग त्यानी. बाकी मग सगळ्यांना बाय म्हणून, साडेदहाला ऑफिसमधून बाहेर पडले. बॉस मिक्को सोबत होता त्यामुळे ट्रेनच्या प्रवासाचा काही ताण नव्हता. बिचाऱ्यानी माझी तेवीस किलोची बॅग कॅरी केली, कौतुकाची गोष्ट अशी माझ्यापेक्षा ग्रेडनी, वयानी आणि अनुभवानी एवढा मोठा असलेला माणूस फक्त मला एकटीला सामान घेऊन जाणं अवघड जाईल म्हणून आला होता. मग रेल्वे स्टेशनची, तिथल्या सोयींची इथम्बूत माहिती देत होता, थोडक्यात सांगायचं तर दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर ज्या काही सोयी आहेत त्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोयी रेल्वे स्टेशनवर असतात इथल्या, आमचं रिझर्वेशन बिझनेस क्लासच्या बोगीचं...

फिनलंड ट्रीप डायरी ११ नोव्हेंबर २०१४

इमेज
 आज पहाटे चार वाजताच जाग आली, म्हणजे तिकडच्या साडेसातला, बॉडी क्लॉक, काही इलाज नाही, मग काही प्रयत्न करूनही झोप आली नाही. सरळ उठून थोडी योगासनं  केली, आणि आवरून ऑफिसला गेले, आता इथलं गार वारं जरा सवयीचं  झालंय त्यामुळे खूप हुडहुडी भरत नाही. अर्थात पूर्ण पॅक होऊनचं बाहेर पडायला लागत. ऑफिस दोन तीन किलोमीटरवरच आहे, पण पावसामुळे चालत जण काही शक्य नाही. सकाळी हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी नाश्ता मिळतो. केलॉग्सचे दोन प्रकार असतात आणि त्याबरोबर स्किम्ड मिल्क तेही थंड गार, गरम गरम उकळता चहा बहुतेक मिळणारच नाही महिनाभर प्यायला. मशीनचा चहा कॉफी पिऊन काही समाधान नाही होत. सलाड असतं सकाळी सकाळी, ते काही मी घेत नाही. अँपल केक छान लागतो, कुकीजपण चांगले लागतात, आणि फळ असतात टोपलीत भरून ठेवलेली. लोकं जाताना एक फळ उचलतात नंतर खायला.  मी पण तसंच  करते, म्हणजे संध्याकाळची सोय होते.    नुसतं सलाड खायला नको म्हणून पेरत्तूने मला दुसऱ्या रेस्टोरंटमध्ये नेलं. म्हणाला, "आज, इकडं तुला गरमागरम सूप पिता येईल", पण सुपात नेमके मीटचे तुकडे होते, मग काय सलाड होतंच, सोबत थं...

फिनलंड ट्रीप डायरी १० नोव्हेंबर २०१४

इमेज
फिनलंड हा देश क्षेत्रफळानुसार आपल्या देशाच्या  एक दशांश  आहे, पण लोकसंख्या खूपच कमी आहे. आपली एक अब्ज तर त्यांची फक्त साडेपाच लाख. प्रवास करताना दूरवर एकसुद्धा घर दिसणार नाही. आपल्यासारखा या लोकांना माणसं गोळा करण्याचा नाद नाही , एकटं राहायला सांगितलं तर आनंदानी राहतील, त्यामुळे बाहेरच्या देशातली लोकं खूप काही येत नाहीत इथे राहायला. फिनलंडच्या दक्षिणेला खाडी आहे. पूर्ण पूर्व सीमारेषा रशियाला जोडली आहे. उत्तरेला नॉर्वे आहे आणि पश्चिमेला बोथनियाची खाडी आणि स्वीडन देश आहे.  हेलसिंकी जिथेपर्यंत माझं विमान होतं ती फिनलंडची राजधानी, सगळ्यात मोठ शहर क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार. राज्य अशी संकल्पना नाहीच इथे. सगळी शहर आहेत, इथे गावं किंवा खेडी पण नाहीत. सगळी शहरच. लहान शहर आणि मोठी शहर, छोटं असो वा मोठं, सोयी सगळीकडे सारख्याच. जगातल्या सगळ्यात आनंदी देशांमध्ये तिसरा आणि महागड्या देशांमध्ये बारावा क्रमांक फिनलंडचा लागतो. पूर्वी इथला मुळ व्यवसाय लाकूडतोड अर्थात ट्री हार्वेस्टिंग आणि त्याच्याशी निगडीत उद्योगधंदे म्हणजेच पेपर उद्योगासारखे उद्योग चालायचे. देशाचा एक त्रितौश भाग ज...

फिनलंड ट्रीप डायरी ०९ नोव्हेंबर २०१४

इमेज
हा देश स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आणि दुसऱ्याचे आभार मानायला लोक तत्पर आहेत. बसमध्ये ड्राइवरला मोई म्हणजे हॅलो म्हणून लोक आत येत होते आणि खाली उतरताना दोघाही एकमेकांना कितोज म्हणजे थँक यु म्हणत होते. पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यातही बस हा खरोखर कौतुक वाटावा असा अनुभव आहे. तरुण   मुली  बार्बीडॉल  सारख्या   गोऱ्या,   नकट्या   आणि   सोनेरी   केसांच्या   आहेत.  त्यांच्या फरच्या  ओव्हरकोट  मध्ये   आणि   गमबूट   मध्ये   खूप  क्युट  दिसत   होत्या,  मुलं   खूप   धिप्पाड   आहेत.   माझ्याशेजारी   एक   सोळा सतरा  वर्षांचा  मुलगा   बसला   होता  आणि  त्याला   पाहून   मला   हॅरी पॉटर मधल्या हॅग्रीड ची   आठवण   झाली. हेलसिंकी फिनलंड ची राजधानी  सोडून   पन्नास साठ किलोमीटर  बाहेर   पडल्यावर,   रस्त्याच्या   कडेला   पांढरे   पांढरे   ढीग दिसायल...

फिनलंड ट्रीप डायरी ०७ नोव्हेंबर २०१४

इमेज
  प्रत्येक वेळी धरित्री वेगवेगळी दिसते. आज धुकं पांघरून घेतलय तिने. या तिच्या वेगवेगळ्या रूपाचा अनुभव ज्यानी त्यानीच घ्यायचा आपापला.  छान वाटतंय खूप. आयुष्यातला वेगळाच अनुभव घ्यायला उड्डाण करतीय आज.  घराचे पाश काही दिवसांसाठी मागे सोडून घेतीय उड्डाण. प्रणव, आर्या,  दोन्ही  आईबाबा, सगळ्यांचा इतका छान आधार आहे, मला जराही काळजी नाहीये घरची.  आयुष्यातला   पहिला   इतका   लांबलचक   आणि   एकटीने   केलेला   प्रवास.थोडी   धाकधूक,   थोडा   आनंद,  थोडं  एकटेपण,  थोडं    कौतुक,   पण   छान   पार   पडला.सुरवात   तरी   चांगली   झाली.   विमानातला   सगळा   नवा  अनुभव.  काही अनुभवी तर काही माझ्यासारखे नवखे देशी-विदेशी  सहप्रवासी ,  पॉलिश्ड  हवाईसुंदरी ,  भव्य  विमानतळ,   जेवण,   चहा,   कॉफी,   ती समोर लावलेली स्क्रीन, बाहेरचं शूट करणारा कॅमेरा,  विमान कुठून उडतंय हे दाखवणारा  नकाशा...

माझे पावसाळे

इमेज
"हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे", किंवा "धरित्रीने जणू हिरवा शालू दिमाखात मिरवावा", नाहीतर "दगडासारखा दगड पण त्यालाही नाजूक नाजूक हिरवळ चढते", अशी काहीतरी वाक्यरचना करत दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शाळेच्या पहिल्या मराठीच्या तासाला निबंध खरडल्याच्या बहुतेक सगळ्यांच्याच आठवणी असतील … निबंधाचा विषय तोच,"शाळेचा पहिला दिवस" किंवा "माझा आवडता ऋतू - पावसाळा", पण दरवर्षी निबंध लिहिताना प्रत्येकांनी एक जास्तीचा पावसाळा बघितलेला असतो, प्रत्येक वाक्यांमध्ये दरवर्षी थोडी प्रगल्भता येते. त्यात काही माझ्यासारखेपण नमुने जे आदल्या वर्षाची वही जपून ठेवणारे, म्हणजे काही नवीन लिहायला नको… पण नेमकं दुसरीने लिहिलेला निबंध ऐकताना आपल्याला असंच लिहायचं होतं अगदी, पण सुचलंच नाही असं दुःख. पावसाळा आणि शाळा साधारण पाठोपाठच सुरु होतात, त्यामुळे दर पावसाळ्यात शाळेची आठवण होणारच, अगदी सत्तरी ओलांडलेल्या आजीआजोबांनाही येत असेल, यंदा लेक नर्सरीत गेली, आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं वळण, पुढे १३ वर्ष शाळा, त्यामुळे पुढची तेरा वर्ष लेकीसोबत माझ्या...

मी फक्त आणि फक्त माझी असताना

इमेज
  सगळं घर शांत निजलं आहे, अजूबाजूच्या घरातले दिवे मालवलेत. हाच तो माझा आवडता क्षण...   आकाशात चांदण्या मंद मंद लुकलुकताहेत आणि गच्चीतल्या झुल्यावर मी हलके हलके झोके घेत सैलावत आहे... दुखरे पाय दाबत दाबत, प्रत्येक झोक्यासरशी दिवसभरातल्या विचारांचा गुंता सोडवतेय..  गार गार वाऱ्याच्या झुळूकेनी गच्चीतला सोनचाफा घमघमतोय, अंगभर काटा फुलतोय,  मी आता शाल लपेटून घेतेय..   शरीरासोबत मन देखील सैलावतय... दूरवरून ऐकू येतयं प्रभा अत्रेचं मारु बिहाग रागातलं, " जागू मै सारी रैना बलमा"...   पण मी मात्र हलके हलके निद्रादेवीच्या कवेत आधीन होतेय... मी फक्त आणि फक्त माझी असताना