स्त्री तत्व आणि पुरुष तत्व दोन्ही आत्म्यात स्थित, पण जेव्हा आत्मा शरीर धारण करतो तेव्हा शिकत जातो, शरीराप्रमाणे त्या त्या तत्वाला जोपासायला. स्त्रीला उपजत सृजनाची जाण येते, त्या सोबत ती काळजी घ्यायला शिकते, माफ करायला शिकते, प्रेम करायला शिकते, अजाणतेपणी. पुरुष शिकत जातो, निधडेपण, धाडस. शरीर पण असंच घडवलंय त्या विधात्याने कि ते ते गुण शोभून दिसतील त्या त्या शरीराला. मग हे असे दोन ध्रुवांवरचे दोन देह अतिशय भिन्न स्वभावाचे आणि त्यामुळेच एकमेकांकडे आकर्षित व्हायला लागतात, सगळीच निसर्गाची किमया, हे चुंबकाच्या वरचं आकर्षण, त्याचं रूपांतरण मिलनात, स्त्रीत्व आणि पुरुषत्वाचं मिलन, तिच्यासाठी सृजनाची गरज, आणि त्यातून हि ओढ, त्याच्यासाठी हे एक धाडस, त्यातून परत एका तिचा किंवा त्याचा अविष्कार. तो बेलगाम, ती गुंतलेली, त्या आविष्कारात, त्या सृजनाची झळाळी तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण रोमारोमात, पालन पोषण, काळजी घेणे हे तिचे गुण, आता त्याचा गुण धाडसाचा, मिळवण्याचा, जगाशी चार हात करण्याचा. हा काळ विरहाचा, दोघांना आपलं स्त्रीत्त्व आणि पुरुषतत्व सिद्ध करण्याचा, तरीही तिच्या गुणांनी त...
पोस्ट्स
एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे