स्त्री तत्व आणि पुरुष तत्व दोन्ही आत्म्यात स्थित, पण जेव्हा आत्मा शरीर धारण करतो तेव्हा शिकत जातो, शरीराप्रमाणे त्या त्या तत्वाला जोपासायला. स्त्रीला उपजत सृजनाची जाण येते, त्या सोबत ती काळजी घ्यायला शिकते, माफ करायला शिकते, प्रेम करायला शिकते, अजाणतेपणी. पुरुष शिकत जातो, निधडेपण, धाडस. शरीर पण असंच घडवलंय त्या विधात्याने कि ते ते गुण शोभून दिसतील त्या त्या शरीराला. मग हे असे दोन ध्रुवांवरचे दोन देह अतिशय भिन्न स्वभावाचे आणि त्यामुळेच एकमेकांकडे आकर्षित व्हायला लागतात, सगळीच निसर्गाची किमया, हे चुंबकाच्या वरचं आकर्षण, त्याचं रूपांतरण मिलनात, स्त्रीत्व आणि पुरुषत्वाचं मिलन, तिच्यासाठी सृजनाची गरज, आणि त्यातून हि ओढ, त्याच्यासाठी हे एक धाडस, त्यातून परत एका तिचा किंवा त्याचा अविष्कार. तो बेलगाम, ती गुंतलेली, त्या आविष्कारात, त्या सृजनाची झळाळी तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण रोमारोमात, पालन पोषण, काळजी घेणे हे तिचे गुण, आता त्याचा गुण धाडसाचा, मिळवण्याचा, जगाशी चार हात करण्याचा. हा काळ विरहाचा, दोघांना आपलं स्त्रीत्त्व आणि पुरुषतत्व सिद्ध करण्याचा, तरीही तिच्या गुणांनी त...
पोस्ट्स
2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
शब्दावाचून कळले सारे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ओशन ब्ल्यू रंगाची झिरझिरीत साडी, त्यावर गडद रंगाचे बारीक ठिपके आणि नाजूक चंदेरी काठ. त्यावर त्याच रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज. डस्की रंगाची ती, हलका मेक-अप, चंदेरी मोठ्या पण नाजूक रिंगा आणि मोकळे सोडलेले केस... या पेहरावात तिचं मादक रूप अधिकच खुलून दिसत होतं. मैत्रिणींबरोबर ती एका गाण्याच्या कार्यक्रमाला निघाली होती. वाटेत एक मैत्रिण चिडवते, "हिला उगीच बोलावलं, सगळा भाव हीच खाऊन जाणार!" दुसरी म्हणते, "आज किती जण पाडणार गं?" पण या सगळ्या चिडवण्याला तिची प्रतिक्रिया फक्त एक गोड स्मित हास्य... पण डोक्यात मात्र फक्त त्याचाच विचार... 'इथे भेटेल का?... किती दिवस उलटून गेलेत... शेवटच्या भेटीच्या आठवणी देखील पुसट होत चालल्यात...' तो असा अचानक नाहीसा झाला होता, कशाच्यातरी शोधात, आपल्याच नादात, 'वाट नको बघूस' असं सांगून. तिला वाटायचं, 'आपलं थोडंच असं होतं...' मनात येतं, 'आपलंच काही चुकलं का, त्याशिवाय पत्ता न सांगता निघून जाईल? आठवणी पुसट होतायत की एक-एक क्षण डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळत राहतोय?' मग ती स्वतःला जपते, छान दिसते, विचार करते, 'अचा...