फिनलंड ट्रीप डायरी २३ नोव्हेंबर २०१४
काल जरा मूड होता , अस वाटत होत का आलो आपण एवढ्या लांब, एकटेच? , आपल्या माणसांपासून दूर, जिथे माणसच नाहीत आणि बाहेरपण पडता येत नाही, कारण दूरवर नुसता बर्फ आणि गोठणारी थंडी , खरं तर कसलीच इच्छा नव्हती , असं वाटत होत कि बाप रे अजून पंधरा दिवस कसे काढणार आपण इथे , त्यामुळे कालचा दिवस जरासा आळस आणि निगेटिव्ह विचारात गेला , पण आज सकाळीचं ठरवलं कि बिझी राहायचं, वाजू दे थंडी बाहेर पडायचंच आणि खरं सांगते आजचा दिवस खुपच छान आणि एनर्जेटिक होता . आज सकाळी नाश्ता आवरून मार्केट मध्ये गेले , मागच्या दोन्ही वेळा जरासं बावरून जेवढं गरजेचं आहे तेवढंच उचलून बाहेर पडले होते आज जरा प्रत्येक सेक्शन मध्ये जाऊन माझी डिक्शनरी काढून वस्तू काय आहेत हे समजून घेतलं , बरेच नविन शब्द माझ्या शब्दकोशात भरती झाले , त्यात सगळ्यात आवडलेला शब्द म्हणजे काक्कू. काक्कू म्...