बाई गं कसं करमत नाही

 

बाई गं कसं करमत नाही ... 

कितीदा ऐकतेय मन भरतच नाही परत परत परत ऐकतेय... 

इतकं बेचैन करून टाकतं मन... 

खरंच सुदभूद हरवून जायला होतं ... 

मग मी बंद करते सरळ, खुप दिवसासाठी... 

आज असं बरेच दिवसांनी ऐकलं परत तिचं बेचैनी पण हवीहवीशी...

तो घननीळा ... 

जन्मोजन्मीची ओळख आमची... 

किती गाढ मैत्री आमची, स्वच्छ निखळ... 

त्या दिवशी अशी काही डोळाभेट झाली की या ह्रदयीचे त्या ह्रदयी कसं झालं कोण जाणे ... ... मला वय, पद, नाती, जबाबदार्‍या, सगळ्याचा विसर पडला ... 

फक्त त्याच क्षणात अडकून पडले.. 

त्याच्या गोर्‍यापान, धिप्पाड,  पिळदार शरीराच्या मोहात पडले... 

दुसरं काहीच दिसेना, सूचेना...  

आणि एका क्षणी परत समोरासमोर आलो.. गाफील होतो.. 

अनपेक्षित भेट होती पण हवीहवीशी... 

डोळे आरक्त झाले..

जणू सांगत होते सगळ काही.. . 

तुझ्यावीण एक क्षणभर पण नाही रहायचंय.. कळावं सगळं त्याला असं वाटत पण होतं त्याचवेळी काही कळू नये असं पण वाटत होतं ... 

किती ही दीलाची चलबिचल ... 

श्वास जणू ताब्यातच नव्हते ... 

त्याला कळलं काय कळायचं ते .... 

तो मेघश्याम ... 

नजरेतूनच आश्वासक तरी स्थिर ... 

डोळ्यांनी जणू सांगत होता सखे थोडा धीर धर ... 

आणि एकदिवस तो अचानक दारात आला ... मी नखशिखान्त मोहरले ... 

स्वतःला सावरायचा वेडा प्रयत्न करत होते ... मागे गाणं वाजत होतं ...

कृष्णसखा दिसला .. 

अवचित वेणू घेऊन हाता ... 

तो जवळ आला माझ्या हृदयानी मला साथ द्यायची सोडली जणू ... 

डोळे मिटून मी त्याच्या स्वाधीन झाले ... त्याच्या प्रत्येक हालचाली मला अधिकाधिक बेभान करत होत्या .. 

जणू वाटत होतं त्याच्या मला चुचकारण्यांनी मी गंधित होतेय मला नशाच चढतेय ... 

माझा सखा माझा मित्र माझा जिवलग माझ्या कवेत आहे किती स्वप्नवत आहे सगळं ... काळजातून जाणारी वीज 

आणि त्याचा स्पर्श ... सुखावत होता मला ... आयुष्य सार्थकी लागल्याचा क्षण ... 

मी आनंदात नाहून निघाले ... 

त्याच्या संपूर्ण सावळा रंग... 

कसलेलं शरीर ... 

चेहऱ्यावरचे मिस्कील भाव .... 

परत गेला तेव्हा मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे समाधानाने बघत राहिले .... 

करमत नाही ग ... 

घुमणारे शब्द मला अस्वस्थ करत नव्हते ... आता माझी मी पूर्ण होते


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४