फिनलंड ट्रीप डायरी २१ नोव्हेंबर २०१४

 इथल्या स्वच्छतेबद्दल आणि सोयींबद्दल खूप सांगितलं आता जर माणसांबद्दल सांगते, इथल्या मुली म्हणजे साधारण तिशीपर्यंतच्या खूप नाजूक नाजूक राहतात म्हणजे लांब लांब केस आणि जरा नखरा वगैरे, पण जरा बायका म्हणजे तिशी पस्तीशी पुढच्या एकदम टॉम बॉय वाटतात म्हणजे खूप नाजूक पणा नसतो चालण्या बोलण्यात जनरली केस छोटे किंवा बॉयकट असतो आणि बिनधास्त असतात खूप. गोल्डन केस आहेत एवढे छान तर आपल्यासारखे काळे करून घेतात, त्यांनी लावलेला मस्कारा खूपच उठून दिसतो, आणि काळे कपडे खूप वापरतात. मुलं केसांची खूप वेगवेगळी रचना करतात म्हणजे काहीचा स्पाईक कटअसतो, काही लांब वाढवतात, नाहीतर पूर्ण टक्कल ठेवतात, पण मोठी माणस जरा ठीक ठाक राहतात

इथे लग्न, मुलबाळ आणि एकत्र राहणं याचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. त्यांच्या फॅमिली विषयी काहीही ऐकताना तोंडावर काहीही भाव आणायचे नाही असं ठरवूनही  माझा वासतोच.

माझा एक बॉस, दोन दिवस सांगत होता कि लेक इन्जुअर झालीय तिला लागलं तर मलाच त्रास होतो, तिनं काहीतरी मोत्याचं  हँगिंग ह्याच्या मोबाईल कव्हरला लावलाय, आता एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसाकडे मोबाईलला मोती जरा ऑड वाटत होतं, माझं लक्ष त्या हँगिंगकडे जायचं तर म्हणाला लेकिन तिच्या अकराव्या वाढदिवसाला मला दिलंय, मला नीट जपायला लागत, तिला वाईट वाटेल नाहीतर. बापलेकीचं नातं वेगळचं असतं , मला वाटलं वा वा क्या बात है, एक दिवसांनी विषय निघाला काहीतरी तर म्हणाला कि वर्षापूर्वी माझी फॅमिलीचं नव्हती, मी एकटा होतो, त्या हँगिंगकडे बघत माझ्या तोंडावरच आश्चर्य काही मावळेच ना, मग म्हणतोय मी तिचा सावत्र बाप आहे. मी मनातच, सावत्र बाप असून एवढं प्रेम.

मी इकडे आल्यावर माझा दुसरा बॉस घ्यायला आला होता मला, त्याची लेक होती त्याच्यासोबत, खर असं आलं होत तोंडाशी कि म्हणावं कि हि अगदी तुझ्यासारखी दिसते पण मागचा किस्सा आठवून शब्द जसेच्यातसे गिळले.

आता माझा कलीग, पहिल्याच दिवशी त्यानी त्याचे फॅमिली फोटो दाखवले हा माझा मोठा मुलगा हि छोटी मुलगी हि बायको हि प्रेग्नंट आहे आतामोठा अगदी माझ्यासारखा आहे. मुलगी अगदी बायको वर गेलीये, अरे वा म्हटलं याच सगळं नॉर्मल दिसतंय, तर काल हसत सांगतोय माझं लग्न मागच्या वर्षी झालं, असं एकदम सांगितल्यावर सगळं पचवणं इतकं अवघड जात मला, मग म्हणाला दहा वर्ष एकत्र राहतोय आम्ही, पहिला मुलगा झाल्यावर एंगेज झालो दुसरी मुलगी झाल्यावर मग लग्न करायचं ठरवलं.

मला म्हणतात कि तुझं सगळं सिक्वेन्सनी आहे का? आधी प्रेम मग एंगेजमेंट, मग लग्न आणि मग लेक?, असली ही लोकं. आणि म्हणतात आम्ही खूप ओपन माईंडेड आहोत "नॉट लाईक एशिअन्स.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४