फिनलंड ट्रीप डायरी १२ डिसेम्बर २०१४

"शनिवारी दुपारी १२ वाजता ट्रेन होती.
महिनाभर राहिलेलं apartment रिकामं करून, सगळ्या खोल्यांना आणि वस्तूंना अलविदा करत मी बाहेर पडले. नाही म्हटलं तरी त्या माझ्या महिनाभराच्या सवंगडी झाल्या होत्या. Driver साडेअकराला दारात हजर होता. त्याने मला आणि माझं सामान ट्रेनमध्ये व्यवस्थित बसवून दिलं. माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता.

बाहेर बर्फ पडत होता, आणि मी तो शेवटचा बर्फ डोळेभरून पाहत होते. बोगीत मला एक Indian जोडी दिसली. सुरुवात English मध्ये झाली, पण मग हिंदीत गप्पा रंगल्या. ते कलकत्याचे होते आणि भारतात माझ्यासोबतच same flight ने येणार होते. बरंच वाटलं — कोणीतरी दिल्लीपर्यंत सोबत.

आठवडाभर अंगात ताप होता. त्या दिवशीही गोळ्या घेऊनच प्रवासाला निघाले होते. थोडं tension होतं — कारण तापाचं कुणाला कळलं तर माझी return trip cancel होण्याची शक्यता होती. पण दैव बलवत्तर — कुठेच checking झालं नाही. तिकडून flight साडेआठ वाजता होती. आत जाऊन बसल्यावर हुश्श झालं. Business class ची seat मिळाली होती, पण पहाटे २ च्या सुमारास पुन्हा हुडहुडी भरली. गपचूप गोळी घेतली आणि पांघरुण गुंडाळून शांत बसले.

सकाळी दिल्लीला पोहोचल्यावर हायस वाटलं.
Passport checking च्या रांगेत उभं राहिल्यावर भारतात आल्याची खरी जाणीव झाली. सकाळी साडेसहा वाजता गर्दी — माणसंच माणसं. चालायला जागा कमी पडेल इतकी. Flight बदलून पुण्यात आले. Company ने ठरवलेला driver थांबलेलाच होता. दुपारचे तीन वाजले होते. कडकडीत उन्ह पडलेलं होतं — आणि ते उन्ह मला खूपच बरं वाटत होतं.

Driver गर्दीतून गाडी काढत होता, आणि मध्ये कोणी आलं की अस्सल पुणेरी शिवी हाडसत होता — म्हणजे मी आपल्या गावात आलेय याची जाणीव होत होती. वाटेत आपली खास पुणेरी, पाणी नसलेली नदी लागली. दोन-तीनदा खड्यात उडालेही, पण त्रास वाटला नाही — उलट आनंदच वाटत होता.

घरी पोहोचले. सगळे वाटच पाहत होते. आर्या आणि अथर्वने welcome चं greeting तयार केलं होतं. पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आई-बाबा पण आले होते. आर्याला मी laptop वरची वाटत होते — त्यामुळे ती मला touch करून आत पळत होती. मग "खरी आई आलीये" याचा विश्वास पटल्यावर ती मला बिलगली.

...आणि मग — घर, माणसं, आठवणी, प्रेम — सगळं पुन्हा माझं झालं."  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी फक्त आणि फक्त माझी असताना

माझे पावसाळे

फिनलंड ट्रीप डायरी १६ नोव्हेंबर २०१४