मी फक्त आणि फक्त माझी असताना
सगळं घर शांत निजलं आहे, अजूबाजूच्या घरातले दिवे मालवलेत. हाच तो माझा आवडता क्षण...
आकाशात चांदण्या मंद मंद लुकलुकताहेत आणि गच्चीतल्या झुल्यावर मी हलके हलके झोके घेत सैलावत आहे... दुखरे पाय दाबत दाबत, प्रत्येक झोक्यासरशी दिवसभरातल्या विचारांचा गुंता सोडवतेय..
गार गार वाऱ्याच्या झुळूकेनी गच्चीतला सोनचाफा घमघमतोय, अंगभर काटा फुलतोय, मी आता शाल लपेटून घेतेय..
शरीरासोबत मन देखील सैलावतय... दूरवरून ऐकू येतयं प्रभा अत्रेचं मारु बिहाग रागातलं, " जागू मै सारी रैना बलमा"...
पण मी मात्र हलके हलके निद्रादेवीच्या कवेत आधीन होतेय...
मी फक्त आणि फक्त माझी असताना
छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप सुंदर ♥️
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाPeaceful
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाछान 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKhoop chaan
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाछानच 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा